विनयभंग करणार्या परप्रांतीय युवकावर गुन्हा !
सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका युवतीला वारंवार भ्रमणभाषवरून विवाह करण्याविषयी त्रास देणार्या अजय यादव या परप्रांतीय युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वर्ष २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत अजय यादव याने पीडित मुलीला विवाह करण्याची विचारणा केली. तसेच तिने नकार दिल्यानंतर तिचा पाठलाग करून तिला त्रास देणे चालू केले. नंतर मुलीला एकटे गाठून विवाह न केल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली, असे पीडितीने दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे.