जोतिबा यात्रेला सशर्त संमती : केवळ २१ मानकर्यांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार !
कोल्हापूर – गतवर्षी कोरोना महामारीमुळे जोतिबाची यात्रा रहित करण्यात आली होती. यंदाही दळणवळण बंदी आहे; परंतु सलग २ वर्षे यात्रा बंद राहू नये यांसाठी आमदार विनय कोरे यांनी देवस्थानचे पुजारी यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी कोरानाचे नियम पाळून यात्रा कशी घेता येईल याविषयी चर्चा केली. या चर्चेत केवळ २१ मानकरी यांच्यासह यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. एरव्ही यात्रेकरता राज्यभरातून, तसेच बाहेरील राज्यांतून ८ ते ९ लाख भाविक यात्रेसाठी उपस्थित असतात.