बीड जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने दोघांचा मृत्यू !

बीड जिल्हा रुग्णालय

बीड – येथील जिल्हा रुग्णालयात २४ एप्रिलच्या पहाटे ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाचा खुलासा करतांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड म्हणाले की, अज्ञात व्यक्तीकडून ऑक्सिजन पुरवठा करणारा मुख्य कॉक बंद झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना होऊ शकला नाही. (ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या मुख्य कॉकपर्यंत अज्ञात व्यक्ती जाते कशी ? यासाठी काही सुरक्षा कशी नाही ? या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे. – संपादक) नुकतेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अर्धा घंटा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.