भारतात मे मासाच्या मध्यापासून प्रतिदिन ५ सहस्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो !
वॉशिंग्टन विद्यापिठाच्या अभ्यासातील निष्कर्ष
नवी देहली – अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ने तिच्या अभ्यासात भारतात कोरोनामुळे मे मासाच्या मध्यामध्ये प्रतिदिन ५ सहस्रांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अभ्यासात दुसर्या लाटेचा सामना करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे.
COVID-19: Second wave in India to peak by mid-May, 5,600 daily deaths likely https://t.co/Lr6PLUl3r4
— Business Today (@BT_India) April 23, 2021
१० मे या दिवशी ५ सहस्र ६०० जणांचा मृत्यू होईल, असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. यासह १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ सहस्र जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ सहस्र मृत्यू होऊ शकतात.