धर्मांध आधुनिक वैद्याला अटक, ५ धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद
ठाणे येथे रुग्णाला खाट उपलब्ध करून घेण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचे प्रकरणआपत्काळातही रुग्णांना लुटणारे धर्मांध ! |
ठाणे, २४ एप्रिल (वार्ता.) – येथील महानगरपालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये कोरोना रुग्णाला भरती करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणात आधुनिक वैद्य परवेझ शेख (वय ४२ वर्षे) याला कापूरबावडी पोलिसांनी २३ एप्रिल या दिवशी अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयात उपस्थित केले असता २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेखसह नाझनीन, अबिद खान, ताज शेख आणि अब्दुल खान अशा ५ जणांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या ग्लोबल कोविड केंद्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना विनामूल्य उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार अतिदक्षता विभागात खाटा आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येतो. तरीही या रुग्णालयात रुग्णाला भरती करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता.
त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. महापौर नरेश म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूक, तसेच खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.