श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

संतांविषयी नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांना ‘पादाभ्यंग’ (तळपायांना गायीचे शुद्ध तूप लावून काश्याच्या (कांस्य धातूूपासून बनवलेल्या) वाटीने घासणे) आयुर्वेदाचे उपचार करण्यात आले. या उपचारानेे रक्ताभिसरण आणि डोळ्यांची दृष्टी सुधारते. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांवर हे उपचार २७.५.२०२० आणि २८.५.२०२० असे दोन दिवस करण्यात आले. पादाभ्यंग करतांना त्यांच्या दोन्ही तळपायांतून द्रव निघाले. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत पादाभ्यंगासाठी उपयोगात आणलेले गायीचे तूप, काश्याची वाटी आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उजव्या अन् डाव्या तळपायांतून निघालेले द्रव यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना :

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण

१ अ १. गायीचे तूप, काश्याची वाटी आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उजव्या अन् डाव्या तळपायांतून निघालेले द्रव यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ अ २. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांना पादाभ्यंग केल्यानंतर काश्याच्या वाटीच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणेे : काश्याच्या वाटीमध्ये आरंभी (पादाभ्यंगापूर्वी) सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ ३.४४ मीटर होती. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांना दोन दिवस पादाभ्यंग केल्यानंतर (म्हणजे काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासल्यानंतर) वाटीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३४.३४ मीटर होती; म्हणजे त्यात ३०.९० मीटर वाढ झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

१ अ ३. पादाभ्यंगासाठी उपयोगात आणलेल्या गायीच्या तुपामध्ये (पादाभ्यंगापूर्वी) सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ ४.२८ मीटर होती.

१ अ ४. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या डाव्या तळपायातून निघालेल्या द्रवापेक्षा त्यांच्या उजव्या तळपायातून निघालेल्या द्रवामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे.

२. पहिल्या दिवशीपेक्षा दुसर्‍या दिवशीच्या द्रवामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

सौ. स्वाती सणस

२ अ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांना घासण्यासाठी वापरलेल्या काश्याच्या वाटीच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होण्यामागील कारण : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासत असतांना त्यांच्या तळपायांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे काश्याची वाटी चैतन्याने भारित झाली.

२ आ. गायीचे तूप सात्त्विक असल्याने त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळणे : गाय मुळातच सात्त्विक प्राणी आहे. तिच्यातील सात्त्विकतेमुळे तिचे दूध, दही, तूप, गोमय (शेण), गोमूत्र यांमध्येही सात्त्विकता आहे. गायीच्या दुधापासून बनलेल्या शुद्ध तुपामध्ये औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदाच्या उपचारांमध्ये तुपाचा उपयोग केला जातो.

२ इ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांना तूप लावून काश्याच्या वाटीने घासतांना होणार्‍या घर्षणामुळे द्रव निर्माण झाले. त्यांच्या चरणांतून (तळपायांतून) प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याच्या प्रभावामुळे त्यांच्या तळपायांतून निघणार्‍या द्रवामध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले.

२ ई. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या डाव्या तळपायातून निघालेल्या द्रवापेक्षा त्यांच्या उजव्या तळपायातून निघालेल्या द्रवामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असण्याचे कारण : शरिराच्या उजव्या भागावर सूर्यनाडीचा (पिंगला नाडीचा) आणि डाव्या भागावर चंद्रनाडीचा (ईडा नाडीचा) प्रभाव असतो. सूर्यनाडी अग्नीतत्त्वाची, तर चंद्रनाडी आपतत्त्वाची निर्देशक आहे. त्यामुळे सूर्यनाडी तेजस्वी (प्रखर), तर चंद्रनाडी शीतल असते. सूर्यनाडी तेजस्वी असल्यामुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या डाव्या तळपायापेक्षा त्यांच्या उजव्या तळपायामध्ये अधिक प्रमाणात शक्ती (चैतन्य) आहे. त्यामुळे त्यांच्या डाव्या तळपायापेक्षा त्यांच्या उजव्या तळपायातून निघालेल्या द्रवामध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असल्याचे चाचणीतून दिसून आले.

२ उ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रव्यामध्ये पहिल्या दिवसापेक्षा दुसर्‍या दिवशी अधिक सकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांना काश्याच्या वाटीने घासल्यामुळे शरिरातील काळी ऊर्जा (अनारोग्यामुळे शरिरात निर्माण झालेली त्रासदायक ऊजार्र्) नष्ट झाली. त्यामुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात उत्तरोत्तर वाढ झाली.’

– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२४.६.२०२०)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक