चोराने क्षमा मागत असल्याची चिठ्ठी लिहून परत केल्या चोरलेल्या लसी !
जींद (हरियाणा) – जींद येथील शासकीय रुग्णालयातून एका चोराने कोरोना लसीचे डोस चोरी केल्याची घटना घडली होती. त्याला या कोरोनाच्या लसी असल्याचे लक्षात आल्यावर त्याने लगेच या लसी येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर एका चहा विक्रेत्याकडे दिल्या आणि त्या पोलिसांना देण्यास सांगितले. या समवेत त्याने ‘सॉरी, मला ठाऊक नव्हते की, यात कोरोनाचे औषध आहे’, असे लिहिलेली एक चिठ्ठीही दिली. चोरलेल्या या लसी जवळपास १२ घंट्यांहून अधिक वेळ शीतगृहाच्या बाहेर राहिल्याने त्यांचा वापर करायचा कि नाही, असा प्रश्न आता येथील वैद्यकीय अधिकार्यांना निर्माण झाला आहे.