रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

१. ‘धार्मिकता, देशाविषयी आणि सामाजिक कार्याविषयी प्रतिबद्धता ही प्रत्येक भारतियाची आवश्यकता का आहे ?’, हे मला आश्रमात आल्यावर कळले.’ – डॉ. अरुण बाळकृष्ण गायकवाड, खारेगाव, ठाणे. (५.३.२०२०)

२. ‘आश्रमात प्रवेश केल्यापासून सकारात्मकता जाणवत होती.’ – डॉ. अविनाश बाबाराव काजगे, कल्याण पूर्व, ठाणे. (५.३.२०२०)

३. ‘आश्रम म्हणजे केवळ ४ भिंती नाहीत, तर ‘मनाला शांतता मिळेल’, अशी जागा आहे. येथे येऊन माझ्या मनाला शांती मिळाली आणि ‘सनातन ही जीवनपद्धत आहे’, हे समजले.’- डॉ. सुनील शंकर औटी, मु.पो. बोरी बु., ता. जुन्नर, जि. पुणे. (५.३.२०२०)

४. ‘ही संस्था त्याग करून हिंदु राष्ट्राला घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे’, हे आश्रमाला भेट दिल्यावर कळले.’ – श्री. दत्तात्रय सोपान ढेंबरे (पोलीस कॉन्स्टेबल, पुणे हेडक्वॉर्टर, पासपोर्ट व्हेरिफिकेशन), मु.पो. पांडवे, ता. संगमनेर, जि. नगर. (५.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक