करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी उपक्रमाच्या अंतर्गत २७ लाख रुपयांचे पेन्शन वाटप !
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा विविध शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन दिली जाते. या पेन्शनधारकांची परवड होऊ नये यांसाठी बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगावातील पेन्शनधारकांना २४ एप्रिल या दिवशी मंगेश्वर मंदिर या ठिकाणी २७ लाख रुपयांची पेन्शन वाटप करण्यात आली. करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने दळणवळण बंदीचे नियम पाळत हा उपक्रम घेण्यात आला.
या वेळी सर्वश्री विक्रम चौगुले, संतोष चौगुले, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, शरद चव्हाण, शिवाजी पाटील, केरबा माने यांसह अन्य उपस्थित होते.