कोरोनाच्या काळात धर्म, अध्यात्म आणि रामचरितमानसचे पठण औषधाप्रमाणे लाभदायक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
जनतेने याविषयी कृती करावी, यासाठी राजनाथ सिंह यांनी सरकारी स्तरावरून लोकांना सांगितले पाहिजे आणि त्यांच्याकडून साधना करून घेतली पाहिजे !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असेही त्यांनी सांगितले. या वेळी लोकगायिका मालिनी अवस्थी यांनी महटले की, सस्वर श्री रामचरितमानसचे अर्थासहित गायन लोकांचे लक्ष नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी पुष्कळ लाभदायक ठरू शकते.
कोरोनाच्या काळात धर्माशी जोडलेले असणे महत्त्वाचे ! – स्वामी अविमुक्तेश्वरानंदद्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, कोरोनाच्या काळात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे. लोकांनी शास्त्र आणि वेद यांचे पठण करण्याचा हा योग्य काळ आहे. याचा भरपूर उपयोग करून लोक स्वतःला या महामारीपासून वाचवू शकतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याला जाणण्याचाही हा चांगला काळ आहे. |