जालना येथे मृत कोरोनाबाधिताच्या खात्यातून धर्मांध आरोग्य कर्मचार्याने रक्कम पळवली !
|
- मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे धर्मांध ! यातून ‘धर्मांध हे हिंदूंना जिवंतपणीच नव्हे, तर मेल्यानंतरही त्रास देतात’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?
- हिंदूंवर खोटे गुन्हे नोंद करणारे पोलीस धर्मांधांनी स्वतःचा गुन्हा मान्य करूनही त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा धर्मांधप्रेमी पोलीस अधिकार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
जालना – जुना जालना भागात रहाणार्या कचरू मानसिंग पिंपराळे या कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर त्याच्या बोटांचा ठसा आणि भ्रमणभाष यांचा वापर करून धर्मांध कर्मचारी मोमीन मोसिन निसार याने ‘फोन पे’ या ‘अॅप’द्वारे रक्कम पळवल्याची घटना १५ एप्रिल या दिवशी जालना येथील कोरोना रुग्णालयात घडली. या घटनेनंतर पोलिसांनी निसार याला कह्यात घेतले. त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली; पण तरीही पोलीस त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
१. धर्मांधाने ‘फोन पे’ अॅपद्वारे पिंपराळे यांच्या अधिकोष खात्यातून ६ सहस्र रुपये स्वतःच्या खात्यावर वळते करण्याचा प्रयत्न केला; पण २ वेळा तो फसला. पैसे वळते होत नसल्याने तिसर्या प्रयत्नात मोमीनने हे पैसे त्याच्या ओळखीचा असलेल्या सूरज मांडोले या व्यक्तीच्या खात्यावर वळते केले. त्या वेळी ६ सहस्र ८०० एवढी रक्कम त्याच्या खात्यावर जमा झाली.
२. सूरज हा जळगाव येथील तरुण कामानिमित्त जालना येथे रहातो. त्याची मोमीनसमवेत तोंडओळख होती. त्यामुळे मोमीनने त्याच्या खात्यावर पैसे वळते केले. पैसे जमा झाल्यानंतर मांडोले याने २ मिनिटात लगेचच ही रक्कम मोमीनच्या खात्यात वळती केली.
३. सकाळी ७ वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवागारात पाठवण्यात आला होता. त्या काळातच त्याच्या भ्रमणभाषवरील ए.टी.एम्.चा ओटीपी घेऊन पिन पालटण्यात आला, तसेच मृताच्या बोटाचा ठसा घेण्यात आला.
४. ३ दिवसांनी मृताच्या नातेवाइकांनी भ्रमणभाषची पहाणी केली असता ही रक्कम हडप केली गेल्याचे समोर आले. नातेवाइकांनी या रकमेसमवेतच मृताच्या खिशामध्ये उपचारांसाठी दिलेले ४० ते ४२ सहस्र रुपये आणि अन्य काही साहित्यही चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
मृत रुग्णाच्या पैशांचा दुरुपयोग करून असे प्रकार होत असतील, तर अन्य मृतांच्या संदर्भात काय ? कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांकडे सोपवला जात नाही, तर त्याच्या अंगावरील दागिन्यांचे काय केले जाते ?, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.