आदेशाचे उल्लंंघन करून चालू असलेल्या व्ही.एल्.सी.सी. वेलनेस अँड ब्युटी सेंटर वर पोलिसांची कारवाई !
पुणे – डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील व्ही.एल्.सी.सी. अँड ब्युटी सेंटर हे सलून चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर धाड टाकल्यावर ग्राहकांची अपॉइंटमेंट (वेळ घेऊन) तेथे सेवा चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या वेळी उपस्थित असलेल्या स्लिमिंग हेड मॅनेजर यांनी मुख्य कार्यालयाकडून सूचना आल्यामुळे सेंटर चालू असल्याचे सांगितले. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.