नागपूर येथील परिस्थिती अधिक गंभीर; ११० कोरोनाबाधितांचा मृत्यू !
नागपूर – शहरात वाढत्या रुग्णसंख्येसमवेत वाढत चाललेल्या मृत्यूंमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. प्रतिदिन मृत्यूंच्या संख्येचा आलेख वरच्या दिशेने जात आहे. मागील २४ घंट्यांत ७ सहस्र ३४४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून ११० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात २२ एप्रिल या दिवशी आलेल्या अहवालात २१ सहस्र ५८५ कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली आहे. यात शहरात ४ सहस्र ६१९ जण, तर ग्रामीण क्षेत्रात २ सहस्र ७१८ जण हे कोरोनाने बाधित झाले आहेत, तसेच ११० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात ५८ बाधित शहरातील, ४५ बाधित ग्रामीण भागातील, तर ७ जण हे बाहेर जिल्ह्यातील होते. याचसमवेत ६ सहस्र ३१४ जणांनी कोरोनावर मात केली.