सौदी अरेबियातील शाळेच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश !
इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणार्या सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशामध्ये रामायण आणि महाभारत शिकवण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र भारतात शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर निधर्मीवादी थयथयाट करतात, हे संतापजनक !
रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाने शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश केला आहे. सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत अन्य देशांचा इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळेच सौदी अरेबियामध्ये रामायण आणि महाभारत शिकवण्यात येणार आहे. यातून भारतीय संस्कृतीमधील योग, आयुर्वेद आदींचीही माहिती मिळणार आहे, असे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त इंग्रजी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.