कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी; निष्काळजीपणा करू नका ! – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल – कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पहाता याचा संसर्ग रोखण्यासाठी, तसेच ‘कोविड १९ लसीकरण जनजागृती’च्या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘फेसबूक थेट प्रक्षेपणा’द्वारे नागरिकांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी आणि गंभीर आहे; मात्र घाबरू नका आणि निष्काळजीपणा करू नका. आरोग्य व्यवस्था, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना होणारा त्रास, साहाय्य, उपाययोजना आदी विषयांवर त्यांनी संवाद साधत नागरिकांना दिलासा दिला.