पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक
मुंबईतील स्फोटके प्रकरण
मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने यापूर्वी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चालू आहे.