रक्ताचे पाट वाहिल्यानंतरच संघर्ष थांबवणार ! – फिलिपिन्सची चीनला युद्धाची धमकी
मनिला (फिलिपिन्स) – दक्षिण चीन समुद्रातील आमच्या हक्काचा भाग आता केवळ शक्तीच्या बळावर मिळवता येऊ शकतो. त्याखेरीज दुसरा पर्यायच समोर नाही. या युद्धात कदाचित् आम्ही विजयी होणार नाही, अशा शब्दांत फिलिपिन्सचे रोड्रिगो दुतेर्ते यांनी चीनला सुनावले आहे. दुर्तेते यांनी विवादित भागात फिलिपिन्सच्या नौदलाच्या तैनातीची घोषणा केली असून ‘आता हा संघर्ष रक्ताचे पाट वाहिल्यानंतरच थांबवणार’, असे त्यांनी म्हटले. दक्षिण चीन समु्द्रात चीन आणि फिलिपिन्स यांच्यामध्ये सातत्याने वाद होत आहेत.