चैत्रवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा आणि श्री विठ्ठलाला द्राक्षांची सजावट !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – चैत्रवारीनिमित्त येथे झालेली श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुजार्यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
चैत्र एकादशीनिमित्त मंदिरात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींची सुंदर सजावट करण्यात आली होती. या सजावटीसाठी ७०० किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला असून संजय टिकोरे या भाविकाने सजावटीसाठी द्राक्षे दिली होती.