श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र – एक अभ्यास (भाग ९)
१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ आमच्या वाचकांसाठी येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
प्रकरण ६ : अविश्वासी लोकांचा प्रादुर्भाव – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/470980.html |
प्रकरण ७ : पोथीतील तिथी, वार, नक्षत्र, वर्षाचे आणि पंचांगातील संदर्भ
१३०० शतकांतील सालांची पंचागे उपलब्ध होणे तसे कठीण परंतु नेटवरून अशी कामे त्यामानाने पटकन आणि अचुक होतात. जगन्नाथहोरा नामक सॉफ्टवेअरच्या मदतीने यावर अभ्यास करता अनेक गोष्टींचा उलगडा होतो. त्यावेळेच्या, स्थळांची कुंडली मांडून त्या त्या दिवसाच्या वार, तिथ्यांचे, घटनांचे महत्व ज्योतिषशास्त्र दृष्ट्या काय व कसे असावे याचा पाठपुरावा तज्ज्ञांनी करावा ही विनंती.
श्रींचा जन्म – १७ ऑगस्ट १३२०
अ ६.४४ -१७ ऑगस्ट १३२० जन्मदिनांकाची पत्रिका सिंह लग्न तूला राशी चित्रा नक्षत्र…
2) श्रींचे पीठापुरातून गमन – २५ मे १३३६
याच दिवसाचे वर्णन पळणी स्वामी ध्यानात करतात.
संदर्भ अ ४ पान २२ वरील केलेल्या वर्णनाचे विश्लेषण करताना तो संदर्भ काल कसा लावायचा ते पाहू. ते म्हणतात, “आजचा दिवस*(श्रींचे पीठापुरातून गमन) शुभ योगांनी युक्त असलेला उत्तम दिवस आहे. (२५-५-१३३६) (हा कंसात घातलेला इसवी दिनांक भाषांतरकारांनी वाचकांना समजायला सोपा जावा म्हणून घातला असावा. इसवी सन मोजणी पोप ग्रेगरी यांच्या मध्यस्थीनंतर सन १७८५ नंतर सुरु झाली. त्यात पुन्हा 11 दिवसांचे गणित करून सध्याची तारीख, महिना व साल मान्यता पावले – कंस माझा.) व आपल्या जीवनातील मोठा वैशिष्ठ्य पूर्ण दिवस आहे. मी (पळणी स्वामी) आज स्थूल शरीर इथेच सोडून सूक्ष्मरुपाने कुरवपुरला जाणार. “एकाच वेळी सूक्ष्म रूपाने चार पाच ठिकाणी जाऊन विहार करणे ही माझी सहज क्रीडा आहे” (हे शेवटचे वाक्य पलणीस्वामींंच्या तोंडून आले असले तरी ते श्रींचे वचन आहे, असे प्रस्तूत लेखकाला वाटते) हे परंतु ते वाक्य पोथीत पलणीस्वामींनी म्हटलेले आहे असे वाटावे असा पटकन वाचणाऱ्याचा ग्रह साहजिक होऊ शकतो. पण तसे ते नाही कारण पलनीस्वामी पुढे म्हणतात की ‘श्रीपादांची आज्ञा होताच मी ही सूक्ष्म रुपाने कुरवपुराला जाईन…’ यावरून २५ मे (१३३६) या तारखेला श्रींनी पीठापुरम सोडले असावे असे निश्चित करता येते. त्या दिवशी शुक्रवार होता असे श्रींचे कथन नाही. पुन्हा गोंधळ निर्माण होणारे वाक्य २५ मे दिनांकाशी निगडीत आहे. ते असे ( सं. अ ४. पान २७) पलणीस्वामी माधव नंबूद्री आणि शंकर भट्टाला उद्देशून म्हणतात, “बाळांनो! आज २५.५.१३३६, शुक्रवार अति पवित्र दिवस आहे”. याठिकाणी दिनांकाला कंस करून म्हटले गेलेले नाही. म्हणजे मूळ तेलगुमधे तो कंसातील दिनांक नसून ती तिथी म्हणजे कृष्ण अष्टमी असावी. ही पोथी अक्षरसत्य असली तरी तो इसवी दिनांक वाचकांच्या सोईसाठी नंतर लिहिला (छापला) गेला असावा.
तिथी तीच पण ४ वर्षांचा फरक असे अभिप्रेत धरले तर २७ मे १३४० ह्या पुढील छापलेली तारीख बरोबर नसून अधिक महिन्याची जेष्ठ सप्तमी या दिवशी बोलताना शुक्रवार असा बरोबर वार जुळतो…
3) काशीत अवतरण, ऋषिकेश, बद्री व केदार उर्वशी ताल, मान सरोवर, कैलाश, करून 13 महिने… श्रींचे गोकर्णला आगमन १९ ऑगस्ट १३३७ (संदर्भ श्रीपादश्रीवल्लभ लीला वैभव पोथी)
४) गोकर्णहून श्रीशैल्य गमन १३ जुलै? १३४० श्री शैल्यात आगमन आषाढ शु एकादशी १४ जुलै १३४०
५) शैल्यात चातुर्मास व ४ दिवस, संपवून निघाले १२ नोव्हेंबर १३४०
६) कृष्णा गावापासून जवळच भीमा-कृष्णा निवृत्ती संगमावर १३ नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा राहून
७) श्रींचे कुरवपुरात आगमन कार्तिक कृ प्रथमा १३ नोव्हेंबर १३४० (लीला अ ११.९८)
८) गोविंदभट्ट कुरवपुरात आगमन – मार्गशीर्ष शु. द्वादशी ९ डिसेंबर १३४०
९) पहिली दत्त जयंती – मार्गशीर्ष पौर्णिमा १२ डिसेंबर १३४०
१०) गोविंद भट्ट आणि इतर गोकर्ण, आळंदी व पंढरपूरला परतले… २० डिसेंबर १३४०
११) शंकर भट्ट आगमन नक्की दिनांकाची नोंद त्यांनी आपल्या ग्रंथात केलेली नाही…. साधारण पहिल्या दत्त जयंतीच्या उत्सवानंतर नंतर ते आले असावेत. (मार्गशीर्ष पौर्णिमा, १२ डिसेबर १३४०) कारण अ१८ १४१ वर श्रीपादांच्या प्रथम भेटी नंतर शंकर भट्ट म्हणतात, “इतक्यात दर्शन घेणाऱ्या भक्तांची रीघ लागली. काही स्त्रिया आपल्या आजारी पतींना घेऊन आल्या होत्या. काही मुलींचे आईवडील मुलीला योग्य स्थळ मिळावे या इच्छेने आले होते. त्या सर्वांना श्रीपाद हळकुंडाचा प्रसाद देत होते. तो घेऊन प्रत्येकजण मंदहास्य करीत निघून जात होते”. यावरून शंकर भट्ट तिथे पोहोचेपर्यंत श्रीपाद कुरवपुरात येऊन तेथील स्थानिकात रुळलेले, आसपासच्या जनसामान्यांच्या ओळखीचे आणि पोरसवदा असूनही तेजस्वी दिसणारे, आपल्या समस्यांना प्रेमळपणे समजून घ्यायला वेळ देणारे, खर्चित उपाय-तापाय न सांगता पटकन गुण देणारे, मान्यवर बाबा/बुवा झाले होते.
विठ्ठलबाबांच्या लीला चरित्रात अ १५ च्या १३४ पानावर शंकर भट्टांच्या भेटीचा प्रसंग त्यांनी अंतरमनाने पाहून वर्णला आहे. तो असा…”श्रीपादांची नजर तेथे बसलेल्या एका व्यक्तीवर गेली. त्याला त्यांनी विचारले, ‘काय रे शंकर भट्टा, प्रवास ठीक झाला ना? सरळ कुरवपुराला पोहोचलास ना”?… यावर शंकर भट्ट म्हणतात, … “देवाधिदेवा, तु सर्व जाणतोयसच. … तुझ्या कृपाकटाक्षाच्यामुळे मी इथवर सुखरूप आणला गेलो. तुझ्या नामस्मरणामुळे वाटेत कोणी वा ना कोणी भेटून मार्गदर्शन करत होते… आता मला दूर लोटून नकोस”… तो ब्राह्मण अशी प्रार्थना करत असताना सर्व जण गप्प बसून ऐकत राहिले’!…. इथे राहायचे असल्यास (कर्मफलांच्या काटेकोर नियमांच्या पालनामुळे) जागरूकतेने जीवन जगावे असा सूचक बोध (श्रींनी) ऐकवला… शंकर भट्टाने आपले जीवन श्रीपादांच्यासेवेत घालवण्याचा दृढ संकल्प केला. ….त्या महाभक्तामुळे श्रींच्या जन्मापासूनच्या लीला अवताराचे रहस्य संस्कृत भाषेत ग्रंथस्थ झाले. श्रीपादांच्या संकल्पानुसारश्री गोविंद मल्लादि दीक्षित या ३३व्या पिढीतील व्यक्तिद्वारे ते चरित्र लोकांपर्यंत पोहोचवून ते श्रीपादांच्या कृपा कटाक्षासाठी पात्र होत आहेत. असे भाष्य विठ्टलबाबांनी यावर केले आहे. पोथीतील १८व्या अध्यायातील प्रथमभेटीचा प्रसंग आणि लीलाचरित्रातील वरील प्रसंग यात तफावत होताना दिसते त्यावर पुढील लेखनात विचार केला गेला आहे.
शंकर भट्टांना (डोळे मिटून) दिसले जे नंतर घडलेले त्यांनी प्रत्यक्ष पाहिले असावे. ती घटना – रविदासाला श्री राज्यवैभव भोगायला बीदरच्या राजवंशात जन्म घ्यायला सुचवतात आणि आपल्या पुढील अवतारात याची जाण करवून देऊ असे सुचवतात- भास्कर बंडावर घडल्याचे (विठ्ठल बाबा) सांगतात… यावरून पुर्वी शंकर भट्टाने ध्यानात जे दृष्य पाहिले, ते त्याच्या पुढे प्रत्यक्ष साकार होताना दिसले असावे. असेच पुढील घटनांच्या बाबतीतील कथन पलनी स्वामींनी अ ४.२७ वर (छापील २५ मे १३३६ तारीख जी प्रस्तूत लेखकाला २७ मे १३४० असावी असे वाटते कारण आपल्याकडे नोंद तिथी, मास, वर्ष, वार, अशी ठेवली किंवा लिहिली जाते. कृष्णाष्टमी, तिथी, मास, वार शुक्रवार तोच यातून वर्ष बदलले असले तरी अन्य तपशील तोच असल्याने जसे २५ मे १३३६ रोजी श्रीपादानी पीठपूर सोडले तसे मी) आता आज मी(पलनी) सन १३४० सालात ही गूहा सोडून कुरवपुरात सूक्ष्ममार्गाने जात आहे. असे जे म्हणतात, त्याला विशिष्ठ अर्थ मिळतो. त्या तारखेच्या दिवशी श्रीपाद मात्र अजून कुरवपुरात पोहोचलेले नसले तरी पलनीस्वामी आधीच कुरवपुरात जातात. मात्र शंकर भट्ट प्रत्यक्ष कुरवपुरात आल्यावर पुन्हा त्यांना, मी पलनी स्वामी, पुर्वी आपण चिदंबरमच्या डोंगरातील गुहेत भेटलो होतो असे त्यांना प्रत्यक्ष भेटून म्हटलेले दिसत नाही!
१२) निजगमन- ६ ऑक्टोबर १३५०
१३५३ तीन वर्षा नंतर आश्विन कृष्ण द्वादशीला तू रचलेला ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत माझ्या पादुकांजवळ ऐकव. ते कृष्णा नदीत अंतर्धान पावले.. अ ५२.२६९
प्रस्तूत लेखक ज्येतिषशास्त्राचा अभ्यासक आहे पण तज्ज्ञ नाही. त्यामुळे वरील कथनात त्रुटी आढळल्या तर त्यावर विचार करून दुरुस्ती केली जाऊ शकते.
प्रकरण ८ : नाडी ग्रंथ भविष्य आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत – वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/471028.html |