बेलमाची (जिल्हा सातारा) येथे वीर पत्नींना भूमी वाटप
सातारा, २३ एप्रिल (वार्ता.) – वाई तालुक्यातील आंबेदरावाडी येथील हुतात्मा सैनिक गणेश ढवळे यांच्या वीर पत्नी रेश्मा गणेश ढवळे आणि फत्यापूर येथील हुतात्मा सैनिक दीपक घाडगे यांच्या वीर पत्नी निशा दीपक घाडगे यांना बेलमाची येथे प्रत्येकी ५ एकर भूमी वाटप करण्यात आली. याविषयी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तहसीलदार रणजित भोसले यांना आदेश दिले होते. त्यानुसार भुईंज येथील मंडलाधिकारी बी.पी. इंगळे यांनी बेलमाची येथील तलाठी जी.आर्. आबटवाड यांच्याहस्ते या जमीनींचे वाटप केले.