नगर जिल्ह्यातील ऑक्सिजननिर्मिती करणार्या आस्थापनांनी यापुढे केवळ जिल्ह्यात मान्यताप्राप्त कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्याचे आदेश !
नगर – नगर जिल्ह्यात सध्या प्रतिदिन अनुमाने ५० टन ऑक्सिजन लागत आहे. जिल्ह्यात सध्या ५ आस्थापने ऑक्सिजनची निर्मिती करतात. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याबाहेर ऑक्सिजन न पाठविता शंभर टक्के कोविड रुग्णालयांना द्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
२० एप्रिल या दिवशी नगरमधील अनेक खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा संपला. तेव्हा त्यांना जिल्हा रुग्णालयातून आवश्यकतेनुसार तात्पुरता पुरवठा करण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन करण्यात आले.