आरोपी श्रीमंत आहे; म्हणून त्याला सवलत देता येऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय
नवी देहली – तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला सवलत हवी आहे; परंतु आम्ही हे करणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका अपघाताच्या खटल्याच्या प्रकरणात आरोपीला सुनावले. कोलकाता येथील उद्योगपती अख्तर परवेज यांच्या मुलाने दुसर्या गाडीला धडक दिल्याने दोघा बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता. याविषयी परवेजच्या वडिलांनी न्यायालयासमोर ‘मुलाची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे त्यास कारागृहात पाठवू नये’, अशी विनंती केली होती; परंतु त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. यास कारण की, घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा १३० ते १३५ किमी वेगाने गाडी चालवत होता. ७ मासांत त्याने ४८ वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले.