सधन वर्गाने कोरोनावरील लस विकतच घ्यावी ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे

मुंबई – १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सधन वर्गाने कोरोनावरील लसीचे डोस विकतच घेतले पाहिजेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. लस कोणत्या घटकांना विनामूल्य द्यायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. २४ एप्रिलपासून ‘कोविन अ‍ॅप’वर १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी चालू होणार आहे. ‘सर्वांना लस देण्यासाठी पुरेसे डोस मिळावेत, यासाठी आता परदेशी लसींनाही देशात मान्यता देण्यात आली आहे; मात्र या लसी महाग असल्याने संबंधित आस्थापनांशी चर्चा करून त्या अल्प किंमतीत मिळाल्या, तर त्यांच्याकडूनही लस खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल’, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

२४ मेपर्यंत उत्पादित होणारी लस केंद्र सरकारने स्वतःकडे घेतली आहे, असे सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे. ‘भारत बायोटेकने राज्य सरकारला विकण्यासाठी लसींचे मूल्य निश्‍चित केलेले नाही’, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.