रेमडेसिविरच्या साठेबाजांवर कडक कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
सांगली – राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोनावर उपाय असणार्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जर कुणी साठा केला, तर त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.