जींद (हरियाणा) येथील सरकारी रुग्णालयातून कोरोना लसींचे १ सहस्र ७०० डोस चोरीस !
आज देशात ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर या गोष्टींचा तुटवडा असल्याने त्यांच्या चोर्या केल्या जात आहेत. पुढील भीषण आपत्काळात लोकांना अन्न-पाणीही मिळण्यास दुर्मिळ झाल्यावर याहून भयावह अराजकता निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता आतातरी लोकांनी साधना करून ईश्वरी कृपा संपादन करावी आणि या आणि पुढील संकटकाळात स्वतःचे रक्षण करावे !
जींद (हरियाणा) – येथील सरकारी रुग्णालयात कोरोना लसींचे एकूण १ सहस्र ७१० डोस चोरीला गेले आहेत. यांपैकी १ सहस्र २७० कोव्हिशिल्ड आणि ४४० कोव्हॅक्सिन यांच्या डोसचा समावेश आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात पोचले, तेव्हा पीपी सेंटरचे कुलूप तुटलेले त्यांना आढळले. यानंतर त्यांनी आत जाऊन पाहिले, तेव्हा ‘स्टोअर रूम’चे कुलूपही तोडण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. कोरोना लसींची तपासणी केल्यावर लसींचे डोस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. त्याच वेळी सेंटरमध्ये ठेवलेले ५० सहस्र रुपये सुरक्षित असल्याचे समजते. या रुग्णालयात कोव्हिड वॉर्ड सिद्ध करण्यात आला असून दिवस-रात्र कर्मचारी सेवेत असतात. येथे सुरक्षारक्षकही ठेवण्यात आले आहेत. तरीही अशा प्रकारे लसींची चोरी कशी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या चोरीचे अन्वेषण करत आहेत.
Over 1,700 Doses Of #COVID19 Vaccines Stolen From Haryana Hospital https://t.co/9RtZQENvAd pic.twitter.com/yWJ1AkNWQ6
— NDTV (@ndtv) April 22, 2021