मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या दोघांना अटक

 

ठाणे, २१ एप्रिल (वार्ता.) – मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यावर बोगस ग्राहक पाठवले असता १६ सहस्र रुपयांना इंजेक्शनची विक्री होत असल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.