मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल
|
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील कॉसमॉस या खासगी रुग्णालयात कोरोनामुळे एक हिंदू आणि एक मुसलमान अशा दोघांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने मृतदेह पिशव्यांमध्ये बांधल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे ते सोपवले; मात्र देतांना अदलाबदल झाली.
मुरादाबाद : अस्पताल की लापरवाही से बदले शव, चिता पर पहुंचे नसीर, कब्र में दफन हुए रामप्रतापhttps://t.co/0jQpdYY5cR via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) April 21, 2021
मुसलमान कुटुंबाने मिळालेला मृतदेह पुरला; मात्र हिंदु परिवाराला अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह त्यांच्या नातेवाइकाचा नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णालयात जाऊन जाब विचारला. घटनास्थळी पोलिसांनी येऊन मुसलमान कुटुंबाला संपर्क केला. त्यानंतर पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून हिंदु परिवारकडे सोपवण्यात आला.