कोरोना महामारीच्या काळात विनामूल्य सेवा देणारा रिक्शाचालक कौतुकास पात्र !
पुणे – कोरोना महामारीच्या काळात येथील रिक्शाचालक संदीप काळे यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवेतील बहुतांश लोकांना विनामूल्य सेवा दिली आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून रिक्शा चालवून उदरनिर्वाह करत आहेत. कोरोना महामारीच्या संकटात रिक्शाचालकांवर उपासमारीची वेळ आली असतांना संदीप काळे यांनी इतरांना साहाय्य केल्याने अनेक जण त्यांचे कौतुक करून आभार मानत आहे.