रुग्णालयातील वैद्यकीय कचरा मनपाच्या घंटागाडीत टाकल्याविषयी दुधनकर रुग्णालयास १ लाख रुपयांचा दंड !
सांगली – शिंदे मळा येथील दुधनकर रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या घंटागाडीत टाकून घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केला. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दुधनकर रुग्णालयास १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील कोणत्याही रुग्णालयांनी त्यांचा वैद्यकीय कचरा हा उघड्यावर, महापालिकेच्या कचरा कंटेनर अथवा घंटागाडीमध्ये न टाकता यासाठी नियुक्त सूर्या एजन्सी यांच्याकडे जमा करायचा आहे. याचे उल्लंघन झाल्यास त्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई समवेत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.