पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना कार्यक्षेत्र सोडता येणार नाही ! – आयुक्त राजेश पाटील
पुणे, २१ एप्रिल – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका स्तरावर अहोरात्र प्रयत्न करण्यात येत असून यासाठी सर्व कर्मचार्यांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. कोविडच्या संबंधी कामकाजाची आवश्यकता असल्यास संबंधित अधिकार्यांनी सुटीच्या दिवशी अधिकारी आणि कर्मचारी यांना उपस्थित रहाण्याविषयी दूरभाषद्वारे सूचना द्याव्यात. सर्व विभागप्रमुखांनी कार्यरत असलेल्या सर्वांची माहिती सूची उपलब्ध करून द्यावी. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहील, याचा पाठपुरावा घेण्यासाठी एक समन्वय अधिकारी नेमावा. तसेच कार्यालयातील कर्मचार्याला वैद्यकीय कारणाच्या व्यतिरिक्त इतर कारणाने सुटी देऊ नये, असे आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.