५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोपरखैरणे, नवी मुंबई येथील चि. मल्हार राहुल यादव (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मल्हार यादव एक आहे !
चैत्र शुक्ल पक्ष नवमी, म्हणजेच रामनवमी (२१.४.२०२१) या दिवशी चि. मल्हार राहुल यादव याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. मल्हार राहुल यादव याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. शीतल राहुल यादव (आई), कोपरखैरणे, मुंबई.
१ अ. गर्भधारणा होण्यापूर्वी औषधोपचार करूनही गर्भधारणेत अडचणी येणे, देव आणि श्री गुरु यांच्यावर श्रद्धा ठेवून साधना करत रहाणे : ‘वर्ष २०१३ मध्ये आमचा विवाह झाला. विवाहानंतर गर्भधारणा होण्यामध्ये अनेक अडचणी आल्या. साधारण ९ – १० आधुनिक वैद्यांकडे औषधोपचार करूनही काही उपयोग होत नव्हता. वर्ष २०१५ ते २०१७ या कालावधीत गर्भधारणेसंबंधी केलेल्या चाचण्या (IVF) अयशस्वी झाल्या. मी देवावर आणि श्री गुरूंवर श्रद्धा ठेवून नामजप करायचे, तसेच ‘कन्नड साप्ताहिक अहवाल, अन् मराठी साप्ताहिकाची पडताळणी करणे’, या सेवा नियमित करत होते.
१ आ. गर्भधारणा
जून २०१९ मध्ये घराजवळ असणार्या एका आधुनिक वैद्यांकडून केवळ २ मास औषधे घेतल्यावर मला गर्भधारणा झाली.
१ इ. गरोदरपणातील सूत्रे
१ इ १. आरंभीच्या रक्तचाचणीचा अहवाल चांगला न येणे आणि नंतरच्या चाचणीचा चांगला अहवाल येणे : गरोदरपणाच्या ४ थ्या मासात माझ्या रक्ताच्या काही चाचण्या केल्या. त्या चाचणीचे अहवाल चांगले आले नाहीत. तेव्हा आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘कदाचित् तुमचे बाळ मतिमंद होऊ शकते.’’ नंतर त्यांनी आणखी दोन चाचण्या करायला सांगितल्या. नंतर केलेल्या रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल प्रभु श्रीरामाच्या कृपेने चांगले आले.
१ इ २. गरोदरपणात केलेली साधना : गरोदरपणाच्या ९ मासात प्रभु श्रीरामाच्या कथा, गीत, रामरक्षास्तोत्र आणि रामायण ऐकणे, अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडून अगदी मनापासून व्हायच्या. माझ्या सासूबाईंनी मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला होता; पण मला ‘श्रीरामा’चाच नामजप करायला आवडायचा.
१ इ ३. आधुनिक वैद्यांचे साहाय्य मिळणे : मी करत असलेला नामजप आणि घरातील सर्व मंडळींची श्री गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा यांमुळेच अनेक संकटांवर मात करता आली. कोरोना महामारीच्या कठीण काळात प्रसुतीच्या केवळ ८ दिवस आधी गावी जाऊनही आधुनिक वैद्यांनी मला सहकार्य केले. त्यांनी माझी नावनोंदणी करून घेतली आणि प्रसुतीसाठी २ किंवा ५ एप्रिल असे २ दिनांक दिले.
१ ई. प्रसुती
२.४.२०२० या रामनवमीच्या दिवशी सकाळी ११.२७ वाजता बाळाचा जन्म झाला आणि मला मुलगा झाला.
१ उ. वय – १ ते ४ मास
१ उ १. शांत आणि सहनशील स्वभाव : जन्मानंतर बाळाने मला कुठलाही त्रास दिला नाही. बाळ शांत आणि हसतमुख असायचे अन् रात्रीही शांत झोपायचे. बाळाला लस दिल्यानंतरही त्याने कधी रडून त्रास दिला नाही.
१ उ २. अनुभूती – मंदिरे बंद असतांनाही दर्शनासाठी एका मंदिरात जाता येणे : बाळ (मल्हार) दीड मासाचा असतांना त्याला गावातील मंदिरात घेऊन गेलो होतो. दळणवळण बंदीमुळे सर्व मंदिरे बंद होती; पण जणू मल्हारसाठीच मंदिराचे दारे उघडली होती. आम्हाला एका मंदिरात देवाच्या चरणांचे जवळून दर्शन घेता आले.
१ ऊ. वय – ५ ते ११ मास
१ ऊ १. देवाची ओढ
अ. मी ‘विठ्ठल विठ्ठल’, असे म्हटल्यावर तो टाळ्या वाजवायचा. विठ्ठलाचे गाणे ऐकतांना तो शांत रहायचा.
आ. मल्हारचे आजोबा देवपूजा करत असतांना तो त्यांच्याकडे जातो आणि उदबत्ती हातात घेऊन सर्व घरात फिरवून बाहेर लावतो.
इ. तो कितीही रडत असला आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजप लावला की, तो शांत होतो.’
१ ऊ २. अन्य सूत्रे
अ. नवी मुंबईला आल्यावर मंदिरे बंद असतांनाही मंदिराच्या पुजार्यांनी मल्हारसाठी मंदिराची दारे उघडली.
आ. मल्हारचे काही केस सोनेरी झाले आहेत.’
२. सौ. तनुजा यादव (आजी (वडिलांची आई), कोपरखैरणे, नवी मुंबई.
२ अ. सात्त्विकतेची ओढ
१. ‘मल्हार ५ मासांचा असतांना नवी मुंबईला आला. मी त्याला घेऊन नामजप करते, तेव्हा तो शांत बसून नामजप ऐकतो.
२. मल्हार रडत असतांना ‘मल्हारचे बाप्पा कुठे आहेत ?’, असे विचारले की, तो शांत होऊन देवघराकडे बघतो.
३. त्याला घेऊन श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभे राहिल्यावर तो चित्राकडे पाहून आनंदी होतो आणि श्रीकृष्णाशी बोलतो.
४. घरी साधक आल्यावर मल्हार त्यांच्याकडे पाहून हसतो आणि त्यांच्या जवळ जाऊन बसतो.
५. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेली सनातन वही फार आवडते. तो सतत ती वही घेऊन बसतो.
२ आ. घरी नातेवाईक किंवा बाहेरील कुणीही आल्यावर ‘मल्हारकडे बघून शांत आणि प्रसन्न वाटते’, असे सांगतात.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |