श्रीरामा, काय तुझे हे रूप ।

कु. अनिकेत सहस्रबुद्धे

सांगली येथील कु. अनिकेत सहस्रबुद्धे (वय १६ वर्षे) याला २.४.२०२० या श्रीरामनवमीच्या दिवशी नामजप करत असतांना सुचलेली कविता पुढे दिली आहे. ​

श्रीरामा, श्रीरामा, काय तुझे हे रूप ।
मखमली सिंहासनावर
दिसतोस विष्णुरूप ॥ १ ॥

तुझ्या सिंहासनावर नाहीत हिरे-मोती ।
तरीसुद्धा तुला बघता, गुंग होते मती ॥ २ ॥

तुझ्या धनुष्याला वर्णू मी किती ।
सज्जन करती ख्याती, तर दुर्जनांना वाटे भीती ॥ ३ ॥

तुझा मुकूट असे सोन्याने मढलेला ।
तसे तुझे रूप आमच्या मनात सोन्यासारखे दडलेले ॥ ४ ॥

तू जसे परम पूज्यांच्या रूपी दर्शन दिलेस आम्हाला ।
तसे दाखवशील का जगाला ॥ ५ ॥

– कु. अनिकेत सहस्रबुद्धे (वय १६ वर्षे), सांगली (२.४.२०२०)