देवाच्या अनुसंधानात राहून केलेली सेवा देवाला आवडेल !
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे
‘पुढीलपैकी कोणत्या साधकाची सेवा देवाला आवडेल ? एक साधक सेवा करतांना ‘चूक तर होणार नाही ना ?’, या विचाराने (भीतीने) सतर्क राहून एक प्रकारे ‘चुकांच्या’ अनुसंधानात राहून सेवा करतो, तर दुसरा साधक ‘देवाच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा देवच करवून घेत आहे, ती करतांना काही चुका झाल्यास, देव मला माझ्या स्वभावदोषांची जाणीव करून देत मला साधनेत साहाय्यच करणार आहे’, या भावाने (देवाच्या अनुसंधानात राहून) सेवा करतो. अर्थात् देवाच्या अनुसंधानात राहून केलेली सेवा देवाला आवडेल !’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)