ठाणे येथे अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत !
८ लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह ५ तलवारी जप्त
ठाणे, २० एप्रिल (वार्ता.) – अमली पदार्थ विकणारी टोळी हातात तलवारी घेऊन आपला काळाधंदा करत असल्याचा प्रकार घोडबंदर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत समोर आला आहे. पोलिसांनी ५ तलवारींसह ८ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून संदीप नांगरे, सूर्यकांत करळकर आणि शाकिर सय्यद या तिघांना अटक केली आहे, तर त्यांचे जब्बार आणि साहिल हे दोघे पसार झाले आहेत. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.