‘भक्तराज बोधामृत’ या ‘अॅप’चा आज रामनवमीच्या शुभमुहुर्तावर आरंभ !
प.पू. भक्तराज महाराज यांच्या अस्तित्वाची प्रचीती देणारी भजने ऐकण्याचे पू. नंदूदादा कसरेकर यांचे आवाहन
कांदळी – ‘श्री रामचंद्रदेव ट्रस्ट एवं पू. भक्तराज महाराज समाधी मंदिर, कांदळी’ यांच्या वतीने रामनवमीच्या शुभमुहुर्तावर, म्हणजे २१ एप्रिल या दिवशी ‘भक्तराज बोधामृत’ या ‘अॅप’चा आरंभ करण्यात येत आहे. या अॅपच्या माध्यमातून प.पू. भक्तराज महाराजांची स्वरचित भजने त्यांच्याच चैतन्यमय स्वरात ऐकायला मिळणार आहेत, तसेच अन्य माहितीही या ‘अॅप’वर उपलब्ध असणार आहे. तरी सर्व भाविक आणि भक्त यांनी हे ‘अॅप’ डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा. ‘कोरोना महामारीच्या काळात प.पू. भक्तराज महाराज आपल्या समवेत आहेत’, अशा भावात राहून ही भजने ऐकूया’, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष आणि प.पू. बाबांचे सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर यांनी केले आहे.