कोठडी, जामीन आणि तात्काळ कामांसाठीच न्यायालयाचे कामकाज
सोलापूर – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार न्यायालयाचे कामकाज आता अडीच घंटे चालणार आहे. या कालावधीत केवळ ५० टक्के कर्मचारी न्यायालयात उपस्थित रहाणार असून न्यायालयीन वेळेमध्ये केवळ आरोपींना पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी, जामीन आणि तात्काळ कामे होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा आणि मॅजिस्ट्रेट न्यायालय केवळ एकाच सत्रामध्ये काम करणार आहे. जिल्हा न्यायालयात कार्यालयीन कर्मचार्यांसाठी सकाळी ९.३० ते १२.३० अशी वेळ देण्यात आली आहे. सकाळी १० ते १२.३० या कालावधीत न्यायालयाचे कामकाज चालू रहाणार आहे.