कुंभ असो वा रमझान, कुठेच कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळले गेले नाहीत ! – अमित शहा
नवी देहली – कुंभ असो किंवा रमझान असो, कुठेही कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळल्याचे दिसून आले नाही. असे वागणे चुकीचे आहे. त्यामुळेच आम्ही आवाहन केले आणि आता कुंभ प्रतिकात्मक पद्धतीने साजरा केला जात आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. ‘केंद्र सरकारने उशिरा निर्णय घेतल्याने ऑक्सिजन आणि औषधे यांंचा तुटवडा जाणवला’, असे मला वाटत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.