पुणे जिल्हा परिषद आपत्ती व्यवस्थापन निधीतून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करणार !
पुणे – ग्रामीण भागांतील कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांसाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. निधीतील ५० लाखांच्या तरतूदीमधून प्रारंभी या इंजेक्शनची खरेदी होणार आहे. नंतर टप्प्याटप्प्याने २ कोटी रुपयांची इंजेक्शन खरेदी करण्यात येईल. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची बैठक झाली.