रमजान घरीच साजरा करावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये !

पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आवाहन

पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे – कोरोना संक्रमण काळ, तसेच दळणवळण बंदी लागू असल्याने शासनाकडून नागरिकांना विविध आवाहने करण्यात येत आहेत. त्यातच रमजान मास आल्याने येथील आयुक्तांनी विशेष आदेश देऊन रमजान काळात नमाज पठण किंवा अन्य कार्यक्रमांसाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता रमजान घरीच साजरा करा, असे आवाहन केले आहे. या कालावधीत मुसलमानधर्मीय सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू शकतात अशा शक्यतेमुळे या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सामाजिक अंतर, स्वच्छतेच्या नियमांचे (मास्क आणि निर्जंतुक द्रव्य वापरणे ) पालन करून रमजान मास साधेपणाने साजरा करावा असेही या आदेशात म्हटले आहे.