पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट
डिचोली, १९ एप्रिल (वार्ता.) – श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रणेते पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात काशीनाथ धनंजय मयेकर यांनी सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली आहे. या प्रकरणी काशीनाथ मयेकर यांच्या विरोधात डिचोली येथील मंदार गावडे आणि गजानन बोर्डेकर यांनी डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. विशेष म्हणजे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची डिचोली येथे १८ एप्रिल या दिवशी महासभा पार पडल्यानंतर ही आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करण्यात आली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, सामाजिक माध्यमात एका ‘स्क्रीन शॉट’मध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या छायाचित्राखाली आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण समाजाला देणारे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना अपकीर्त केल्याने गोमंतकियांच्या भावना दुखावल्या आहेत. काशीनाथ धनंजय मयेकर यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करावी.