‘राजकारण’ ही कोरोनापेक्षा देशाला पोखरणारी घातक कीड ! – तेजस्विनी पंडित, अभिनेत्री

समाज मृत्यूच्या दाढेत असतांना सध्या चालू असलेले स्वार्थी राजकारण हे अत्यंत चुकीचे आहे. अशा स्वार्थी राजकारणाऐवजी प्रजाहितदक्ष असणारे हिंदु राष्ट्र आवश्यक !

तेजस्विनी पंडित

मुंबई – आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला लागलेली सगळ्यात मोठी कोणती कीड असेल, तर ती ‘राजकारण’ होय. ही कीड कोरोनापेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या किडीपासून वाचवता आले, तर बघा, असे लिखाण अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यात जे राजकारण चालू आहे, त्यावरून या ‘पोस्ट’द्वारे तेजस्विनी पंडित यांनी संताप व्यक्त केला आहे.