लालूप्रसाद यादव यांना दुकमा कोषागार प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन संमत

लालूप्रसाद यादव

पाटलीपुत्र (बिहार) – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना दुमका कोषाभारमधून ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यामुळे ते आता कारागृहातून बाहेर येऊ शकतात. लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यांना या प्रकरणातही यापूर्वी जामीन मिळालेला आहे. चईबासा आणि देवघर कोषागार प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे, तर दोरांडा कोषागार प्रकरणी खटला चालू आहे.