गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ।

सौ. मनीषा पाठक

पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सकाळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक ‘गुरुलीला सत्संग’ घेतात. या सत्संगात त्या साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. सर्व साधक संघभावाने प्रयत्न करत असतात. या सत्संगाविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्नेहल गुब्याड यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.

कु. स्नेहल गुब्याड

आमच्यातील गुरुभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यास ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ १ ॥

आमच्यातील दोष-अहं नष्ट होण्यासाठी
प्रक्रियेचे महत्त्व सांगणारे ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ २ ॥

विचारांचे ओझे सोडून हलके बनण्यासाठी ।
‘क्षमायाचना करा साधकहो’, असे सांगणारे ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ ३ ॥

परिस्थिती कशीही असो ।
‘अखंड गुरुस्मरणात रहा’, असे सांगणारे ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ ४ ॥

घराला आश्रम करण्यासाठी बोट धरून समजवणारे ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ ५ ॥

या आपत्काळात कशी काळजी घेऊया ।
हे आईसारखे सांगणारे ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ ६ ॥

‘प्रत्येक सेवा संघभावाने सेवकभावाने करूयात’, असे सांगणारे ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ ७ ॥

लहान लहान गोष्टींतून स्वतः आनंद घेऊन ।
इतरांनाही आनंद देऊन ।
‘आनंदी साधक फूल बनूया’, असे सांगणारे ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ॥ ८ ॥

आमची ही दिवाळी आत्मज्योत लावून आनंददायी करणार्‍या ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परमपूज्य ।
गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परमपूज्य ॥ ९ ॥

– कु. स्नेहल गुब्याड, सिंहगड रस्ता, पुणे. (३०.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक