सांगली येथील छत्रपती शिवाजी मंडईतील घाऊक भाजी विक्री बंद !
सांगली, १९ एप्रिल (वार्ता.) – सांगलीत भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील भाजी मंडईतील घाऊक भाजीविक्रीसह किरकोळ भाजी विक्रीही बंद केली आहे. सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने हा परिसर पत्रे मारून ‘सील’ करण्यात आला आहे. १९ एप्रिलपासून विविध भागांत भाजी विक्रीसाठी अनुमती देण्यात आली आहे, तसेच या भागात भाजी विक्री आणि सौदे यांना बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईची चेतावणी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली आहे.