सातारा जिल्‍ह्यातील ‘ऑक्सिजन बेड’साठी ५० लाख रुपयांचा निधी !

सातारा – जिल्‍ह्यातील विविध आरोग्‍य केंद्रांसाठी ५० लाख रुपयांचे १८० ‘ऑक्सिजन बेड’ उपलब्‍ध होणार आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्‍या मागणीवरून पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्‍हा नियोजन समितीमधून ही तरतूद केली आहे. यामध्‍ये जिल्‍ह्यातील वडगाव हवेली, पुसेगाव, क्षेत्रमाहुली, वडूथ आणि अंगापूर या आरोग्‍य केंद्रांचा समावेश आहे. याविषयीचे उत्तरदायित्‍व सातारा जिल्‍हा परिषदेचे असून त्‍याची तात्‍काळ पूर्तता करण्‍यात आली असल्‍याचे समजते.