आज कळंबोली रेल्वे स्थानकावरून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणम् येथे रवाना होणार !

१० टँकर भरून ऑक्सिजन महाराष्ट्रात येणार

कळंबोली – कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनचा महाराष्ट्रात सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाकडून १९ एप्रिल या दिवशी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोली रेल्वे स्थानकावरून विशाखापट्टणम् आणि जमशेदपूर येथे पाठवण्यात येणार आहे. यात १० टँकर रिकामे पाठवले जाणार आहेत. विशाखापट्टणम् येथून हे टँकर भरून ऑक्सिजन महाराष्ट्रात पाठवण्यात येतील. ऑक्सिजनची वाहतूक ही द्रव स्वरूपात असल्याने रेल्वे प्रशासनाने विशिष्ट प्रकारचे रेल्वेडबे सिद्ध केले आहेत.