मातृभूमीसाठी प्राणांचे बलीदान करणारे अनंत कान्हेरे !
१९ एप्रिल २०२१ या दिवशी क्रांतीवीर अनंत कान्हेरे बलीदानदिन आहे. यानिमित्ताने…
नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. अनंतरावांनी चपळाई करून जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला.
जॅक्सन वधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या कारागृहात सकाळी ७ वाजता फाशीची शिक्षा झाली.
(संदर्भ : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)