इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांना अडकवणार्‍या अधिकार्‍यांची सीबीआय चौकशी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांना वर्ष १९९४ मध्ये खोट्या हेरगिरीच्या प्रकरणात अडकवल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संबंधित अधिकार्‍यांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. यासाठी ३ मासांची मुदत देण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचेही या आदेशात म्हटले आहे. हा अहवाल सार्वजनिक करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नंबी नारायणन् यांच्यावर क्रायोजेनिक इंजिनच्या संदर्भातील माहिती विदेशांना पुरवल्याचा खोटा आरोप करून त्यांना अटक करून त्यांचा छळ करण्यात आला होता. हा आरोप खोटा असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना यात फसवणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.