पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

पुणे – पुण्यातील जाधव कुटुंबातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्वांना संसर्ग होऊन केवळ १५ दिवसांत ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.