श्रीरामनवमीच्या दिवशी घरीच राहून पूजा करा !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील साधू-संतांचे आवाहन
अयोध्या (उत्तरप्रदेश) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील साधू आणि संत यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी अयोध्येत येण्याऐवजी घरामध्ये राहून पूजा-अर्चना करावी, असे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने या साधू आणि संत यांना भेटून कोरोनाच्या संदर्भात सहकार्य करण्याची विनंती केल्यावर त्यांच्याकडून वरील आवाहन करण्यात आले.